बोलेरोच्या धडकेत आजगाव येथील रिक्षाचालक जखमी. ; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

सावंतवाडी :  तालुक्यातील आजगाव-भोमवाडी येथील रिक्षाचालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४२) हे प्रवाशाला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडून रिक्षाने आजगाव-भोमवाडी येथे परतत असताना समोरून आलेल्या बोलेरो वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात बाळे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मळेवाड-कुंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे, सागर नाईक व साहिल नाईक यांनी अटल प्रतिष्ठान सावंतवाडी, कै. सदाशिव सखाराम मराठे सेवाभावी ट्रस्ट आणि युवा मित्र मंडळ मळेवाड-कुंडुरे यांच्या रुग्णवाहिकेतून बाळे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. इंजेक्शन व औषधोपचार केल्यानंतर सिटीस्कॅन करण्यात आला असून सध्या त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला दुखापत झाल्याने टाके घालण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने उपचार केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी रुग्णाला आवश्यक सहकार्य केले. या मदतकार्यात पत्रकार तथा उपसरपंच हेमंत मराठे, सागर नाईक आणि साहिल नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सभा लाड खान, डॉ. दिनेश संगेवार तसेच आरोग्य कर्मचारी कृष्णा जाधव यांनी जखमी रुग्णावर तातडीने उपचार करत डोक्याला टाके घालण्यासाठी सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles