नवरात्रोत्सवात भाजप युवा नेते विशाल परब यांची भक्तिभावपूर्ण हजेरी! ; आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक होत घेतले देवीचे दर्शन! ; मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!

सावंतवाडी : भक्तीचा सुगंध, देवीच्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि नवरात्रोत्सवाच्या मंगलमय सोहळ्यात दाटलेला उत्साह… अशा भक्तिमय वातावरणात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी सावंतवाडी येथील लता लॉज कॉर्नर येथील नवरात्रोत्सवाला सदिच्छा भेट देत आदिशक्ती श्री देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत जनकल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या उपस्थितीने उत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली.

परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंडळाचे हे ३६ वे वर्ष! गेल्या अनेक वर्षांपासून भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या मंडळाच्या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. अशा या भक्तिमय सोहळ्यात विशालजी परब यांच्या आगमनाने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांच्यासह श्रीकांत म्हापसेकर, अतुल पेंढारकर, संतोष मुंज, नंदू गावकर, नितीन मुंज, शैलेश गवंडळकर, प्रसाद देऊलकर, विशाल वाडकर, बाबू मेस्त्री आणि दत्ता सावंत यांनी विशालजी परब यांचे उत्साहात स्वागत केले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी युवा मोर्चा सावंतवाडीचे अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक जिव्हाळ्याचा सुंदर संगम! नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या चरणी लीन होत विशालजी परब यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. भक्ती आणि परंपरेच्या या मंगलमय सोहळ्यात त्यांच्या भेटीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. लता लॉज कॉर्नरच्या नवरात्रोत्सवाने पुन्हा एकदा सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील आपले स्थान अधोरेखित केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles