सावंतवाडीत ‘ब्लॅक फिल्मिंग’ गाड्यांचा सुळसुळाट!, पोलीस प्रशासन कारवाईचा बडगा कधी उगारणार? ;  माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचा थेट सवाल!, “नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाड्या पोलिसांना दिसत नाहीत का?”, निदर्शनास आणूनही कारवाई का होत नाही?, नागरिकांतूनही वारंवार उपस्थित होतोय प्रश्न

सावंतवाडी :  सावंतवाडी शहरात काळ्या काचांच्या गाड्यांचा राजरोस वावर सुरू असताना, या नियमबाह्य प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नेमकी कोणती पावले उचलत आहे? असा थेट सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. शहरात ब्लॅक फिल्मिंग गाड्यांचा वाढता वापर, नियमांचे उघड उल्लंघन आणि तक्रारीनंतरही कारवाईबाबत दिसणारी अनिश्चितता यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी शहर आणि परिसरात काळ्या फिल्मच्या काचा लावलेल्या वाहनांचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या काचांवर नियमबाह्य काळी फिल्म लावणे हे मोटार वाहनविषयक नियमांचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे अशा वाहनांवर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नसल्याचा मुद्दा माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती सावंतवाडी पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले आहे. तरीही संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी असोत किंवा वाहनधारकांसाठी, त्यांची अंमलबजावणी समान पद्धतीने होणे आवश्यक आहे. मग काळ्या काचांचा वापर करणाऱ्या वाहनांबाबत कारवाईचा हात आखडता का घेतला जात आहे, असा प्रश्नही या निमित्ताने चर्चेत आला आहे.

वाहनांच्या काचांवर अनधिकृत काळी फिल्म वापरण्याच्या प्रकाराकडे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन म्हणून नव्हे, तर वाहनातील व्यक्तींची दृश्यमानता आणि सुरक्षिततेशी संबंधित बाब म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे.

आता सावंतवाडी पोलीस प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का? की काळ्या काचांच्या गाड्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार? असा सवाल उपस्थित होत असून, संबंधित विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाहतूक शिस्तीचा धाक निर्माण होणार का, याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles