सावंतवाडी : इंडिया ओपन कॉम्पिटिशन इन रायफल अँड पिस्टल आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी रोहन घावरे याने उत्तुंग यश संपादित केले. भोपाळ मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 400 पैकी 383.7 गुण मिळवून त्याने नॅशनल स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले असून ही नॅशनल स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे. रोहन यास प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, क्रीडाशिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



