ज्येष्ठ साहित्यिक विजय जोशी यांना युनायटेड अमेरीकन युनिव्हर्सिटीची ‘मानद वाङमयाचार्य’ पदवी प्रदान.

मुंबई: कवी, गझलकार, गीतकार, लेखक, समीक्षक श्री.विजय जोशी (विजो), डोंबिवली (मूळ गाव मसुरे, मालवण, सिंधुदुर्ग) यांच्या मागील‌ जवळपास ३० वर्षांच्या कविता साहित्यातील योगदानाची दखल घेऊन युनायटेड अमेरीकन युनिव्हर्सिटी यांनी ‘मानद वाङमयाचार्य (Doctor of Literature) ( D.Litt.)’ पदवी देऊन विजो यांना सन्मानीत केले आहे. याबद्दल कवी विजो यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

वृत्तबद्ध कवितेचा ध्यास घेऊन कविता साहित्यात सक्रीय असलेले विजय जोशी हे ‘विजो’ या टोपण नावाने सर्वपरिचित आहेत. विजो यांनी आजवर वृत्तबद्ध कविता आणि गझलच्या ८० पेक्षा जास्त कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. याचा लाभ महाराष्ट्र आणि देशा परदेशातील अनेक कवींना झाला असून, आज अनेक जण छान वृत्तबद्ध कविता लिहू लागले आहेत. ही मराठी साहित्यातील एक मोठी उपलब्धी आहे.

‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ हे त्यांचे पुस्तक नवोदित कवींना मोलाचे मार्गदर्शक ठरत आहे. त्यांची ‘बाया’ ही कविता विविध ५६ भाषांमध्ये अनुवादित झाली आहे आणि हा मराठी कवितेच्या अनुवादाचा जागतिक विक्रम ठरला आहे. याशिवाय विजो यांनी विविध ५१ वृत्तांमध्ये आई या एकाच विषयावर काव्यपंक्ती/ लक्षणपंक्ती लिहून (वृत्ताई) जागतिक विक्रम केला आहे. वय वर्षे ५७ असलेल्या विजो यांनी साहित्य क्षेत्रात सक्रियतेने कार्य करीत असतात. कविता संग्रह, अभ्यास पुस्तके, पुस्तक परिचय, अनुवादित कविता, समीक्षा लेख… असे विजो यांचे विविध साहित्य प्रकाशित आहे, प्रकाशित होत असते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles