आरोंद्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मकाचा आधार! ; जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना मका वाटप.

आरोंदा : शेतकऱ्यांच्या शेतीला बळ मिळावे, त्यांच्या उत्पन्नवाढीला हातभार लागावा आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने आरोंदा येथे शेतकरी बांधवांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते हा उपक्रम उत्साहात पार पडला.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या प्रगतीतूनच गावाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास साध्य होतो. या भावनेतून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मका वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री आणि प्रोत्साहन मिळाल्यास कृषी क्षेत्र अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles