निरवडेच्या विकासाला मिळाली गती!, चार रस्त्यांच्या कामांचा श्रीगणेशा! ; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांच्या उपस्थितीत भूमिपूजन! ; आमदार दीपक केसरकर, संजू परबांच्या सहकार्याने विकासकामांना गती! ; सरपंच सुहानी गावडे यांच्याकडून आभार व्यक्त.

सावंतवाडी : गावाच्या विकासाची वाट आता अधिक सुकर होणार असून, निरवडेतील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा विकासश्रीगणेशा उत्साहात पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या विकासकामांमध्ये सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी तसेच भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने गावाला मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी सरपंच सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाच्या सहकार्याबद्दल मान्यवरांचे आभार!

निरवडे गावाच्या विकासासाठी आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना युवा नेते सूरज परब यांनी केलेल्या सहकार्यामुळे गावातील महत्त्वाची विकासकामे मार्गी लागत आहेत. या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी गावाच्या वतीने सर्वांचे विशेष आभार मानले.

गावाच्या विकासाला मिळणारी ही साथ आणि रस्त्यांच्या कामांना मिळालेली गती यामुळे निरवडेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, विकासाच्या दिशेने गावाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles