सावंतवाडी : वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाच्या युवा सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझगाव जिल्हा परिषद युवा विभाग प्रमुख या पदावर मंदार सदानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद किशोर डेरे यांनी श्री. सावंत यांना पत्र देऊन निवड झाली असल्याचे कळविले आहे. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंदार सावंत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे, शहराध्यक्ष निखिल सावंत, युवा सैनिक प्रतीक बांदेकर, वर्धन पोकळे आदी उपस्थित होते.
मंदार सावंत यांची माजगाव जिल्हा परिषद युवा विभाग प्रमुख पदी नियुक्ती. ; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केले अभिनंदन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


