कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर दहावी परिक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत!

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्राचे संचालक प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, उपकेंद्र संचालक श्री आर टी सावंत, सावडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक अच्युतराव वणवे, परिरक्षक सौ. मांजरेकर मॅडम व श्री. दुखंडे सर यांनी केंद्रावर येणाऱ्या परिक्षार्थीचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. सर्व परिक्षार्थीना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पर्यवेक्षक श्री. वणवे सरांनी परिक्षेच्या संदर्भात परिक्षार्थीना सूचना दिल्या. दहावी परीक्षा तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडवी., याची मानसिकता सर्व विद्यार्थाची तयार झाली. परिक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा दालनात सोडण्यात आले. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ADVT –

 

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles