सावंतवाडी : शनिवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी संघ निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून मुलांचे 13 आणि मुलींचे 10 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या संघाने देखील सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये विद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सर्धेत मिलाग्रिस हायस्कूलचा विद्यार्थी अथर्ववेद भरमणा वाणी (इयत्ता नववी) याची अंतिम 15 खेळाडूंच्या निवड चाचणी शिबिरासाठी निवड झाली होती.
या निवडचाचणीनंतर घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणाऱ्या अंतिम संघामध्ये कु. अथर्ववेद वाणी याची निवड झाली असून हा संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे. अथर्ववेद हा आजगाव येथील अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक बी. आर. वाणी यांचा सुपुत्र आहे.
अथर्ववेदच्या यशस्वी निवडीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो, हितेश मालणकर व अनिता सडवेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.