Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

जनतेला फसवून सावंतवाडी मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या केसरकरांना जागा दाखवा.! – रुपेश राऊळ यांचा घणाघात. ; सोनुर्ली येथे शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रेत मंत्री केसरकरांचा घेतला समाचार, उबाठा सेनेतर्फे वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न.

सावंतवाडी : तब्बल 15 वर्ष संधी दिल्यानंतरही सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवणाऱ्या आणि येथील विकास ठप्प करून ठेवलेल्या, केवळ घोषणा करून जनतेच्या भावनांशी खेळून फसवणूक करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना आगामी काळात विधानसभा निवडणुकीतून हद्दपार करून त्यांची जागा दाखवा, असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सोनुर्ली येथे आयोजित कार्यक्रमात केला.

आज सोनुर्ली येथे शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रा पोहोचली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकरांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील तब्बल 15 वर्षे आमदार असलेले व त्यातील साडेसात वर्ष मंत्रीपद उपभोगलेले आमदार दीपक केसरकर यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे. येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवून त्यांनी जनतेच्या भावनांना तिलांजली दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने निवडून द्यावे व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे राऊळ यांनी सांगितले.

 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा जिल्हा समन्वयक बाळा गावडे,  तालुका संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र म्हापसेकर, भारती कासार, श्रीमती कासार, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस, कौस्तुभ गावडे, शब्बीर मणियार, अशोक दत्ताराम परब (शिवदूत), शाखाप्रमुख नरेश मोरे, युवा सेना विभाग प्रमुख संदेश मडुरकर, अनिल गावकर, नामदेव गावकर, अनिता गावकर, आर्वी गोसावी, बाबी धडाम, सोमा धडाम, सरस्वती धुरी, रुक्मिणी राऊळ, निलेश मोर्ये, संकेत गावकर, बापू मोर्ये, मारुती म्हापसेकर, सुरेश गावकर,तिळबा जाधव, उत्तम नाईक, धोंडीबा गावकर, महादेव गावकर, मनोहर गावकर, माई मौर्ये, रामचंद्र गावकर, वैभवी गावकर आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनीही आपल्या मनोगतातून मंत्री केसरकरांवर जोरदार प्रहार केला व उपस्थितांना महाविकास आघाडीलाच साथ द्यावी, असे आवाहन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles