सुवर्णसंधी.! – आज कुडाळ येथे निवेदन व भाषण प्रशिक्षण शिबीर!, दिग्गज पाडणार वक्तृत्व कलेचे पैलू. ; आधार फाऊंडेशन सिंधुदुर्गचा उपक्रम, लाभ घेण्याचे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.

कुडाळ : हल्ली प्रत्येकाला कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे वक्तृत्व कला. वक्तृत्वा शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला चांगले स्वरूप प्राप्त होत नाही. हीच बाब लक्षात घेता आधार कन्सल्टन्सी व फायनान्शिअल सर्विसेस, सिंधुदुर्ग आणि आधार फाउंडेशन, सिंधुदुर्ग आयोजित निवेदन व भाषण कला प्रशिक्षण शिबीर आज दिनांक 9 मार्च रोजी कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास येथे सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत आयोजित केले आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी ही सुवर्णसंधी सोडू नये, असे आयोजकांनी कळविले आहे.

दिग्गज मान्यवर करणार मार्गदर्शन –

या प्रशिक्षण शिबिरात निवेदक आणि प्रेरक वक्ता इन्फो मोटिवचे श्री. राजेश सावंत तसेच सुप्रसिद्ध प्रशिक्षक आणि निवेदिका श्रीमती सुमन केळुसकर (विश्वमंगल स्किल एज्युकेशन) हे दिग्गज प्रशिक्षण देणार आहेत. एक दिवसीय या शिबिरामध्ये संपूर्णपणे थेअरी आणि प्रॅक्टिकल याचा अनुभव देण्यात येणार आहे. म्हणून आगामी काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात ठसा उंचविण्यासाठी आपल्या वकृत्व कलेचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी सोडू नये असे आवाहन अँड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये –

निवेदन व भाषण प्रक्रिया भाषणाची भीती घालवण्याची पाच प्रभावी तत्वे.

स्क्रिप्ट कशी बनवावी?, यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.

भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट कसा असावा? ऐनवेळी कसे बोलावे?, यांसारख्या मुद्द्यांवर दिग्गज मान्यवर मार्गदर्शन करणार असून या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर व त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

तरी या अद्वितीय संधीचे सोने करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असेही ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी कळविले आहे.

अधिक माहितीसाठी 9422434356 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे या प्रशिक्षणाचे मूल्य केवळ 2500/ रुपये एवढे असून यात प्रशिक्षण कालावधीत जेवण, चहा व नाश्ता देण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles