पहिली मॅच देवाला!, सलग १३ व्यांदा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव! ; घरच्या मैदानावर चेन्नईनं फोडला विजयाचा ‘नारळ’.

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 5 बॉलआधी पूर्ण केलं. चेन्नईने 19.1 ओव्हरमध्ये 158 धावा केल्या. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र या दोघांनी चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. चेन्नईसाठी या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रचीनने नाबाद 65 धावा केल्या. तर ऋतुराजने 53 धावांची खेळी केली.

चेन्नईत नूर अहमद अन् खलीलचा कहर –

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईची सुरुवात खुपच खराब झाली. खलील अहमदने रोहित शर्मा पहिल्याच षटकात आऊट केले, तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर खलीलने रायन रिकेलटनला (13) आऊट करून मुंबईला अजून एक धक्का दिला. सीएसकेमध्ये परतल्यानंतर पहिल्या सामन्यात खेळताना आर अश्विनने पण कामालाची कामगिरी केली. तो येताच त्याने विल जॅक्सला आऊट केले आणि त्याला पहिले यश मिळाले.

36 धावांत तीन विकेट गमावलेल्या मुंबईला चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा क्रीजवर होते. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 40 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. पण, ही भागीदारी नूर अहमदने फोडली, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा वाटा मोठा होता. कारण त्याने चपळता दाखवली आणि सूर्याला यष्टीच्या मागून यष्टीचीत केले. 26 चेंडूत 29 धावा काढून स्टँड-इन कर्णधार आऊट झाला.

मुंबईडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉबिन मिंजने तीन, नमन धीरने 17, मिचेल सँटनरने 11 आणि ट्रेंट बोल्टने एक धाव केली. या सामन्यात दीपक चहर 28 धावांवर नाबाद राहिला आणि सत्यनारायण राजू 1 धावांवर नाबाद राहिला. सीएसकेकडून नूर अहमदने 4 आणि खलील अहमदने 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय, नाथन एलिस आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रचिन रवींद्र ठरला विजयाचा हिरो –

156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का धक्का बसला. राहुल त्रिपाठी फक्त दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी आघाडीची सूत्रे हाती घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 67 धावांची भागीदारी झाली. 53 धावांची दमदार खेळी खेळून कर्णधार गायकवाड आऊट झाला. यानंतर चेन्नईचा डाव अडखळला पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने रचिन रवींद्रसोबत 36 धावांची भागीदारी करून संघाला विजयापर्यंत नेले.

पण, रवींद्र जडेजा विजयापासून फक्त चार धावांनी दूर धावबाद झाला. या सामन्यात शिवम दुबेने नऊ धावा, दीपक हुड्डाने तीन आणि सॅम करनने चार धावा केल्या. दरम्यान, रचिन रवींद्र 65 धावांवर नाबाद राहिला आणि महेंद्रसिंग धोनी खाते न उघडता नाबाद राहिला. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण करणाऱ्या विघ्नेश पुथूरने तीन विकेट्स घेतल्या तर दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles