सावंतवाडी : तळकोकणातील ऑप्टिक्स क्षेत्रात अत्यंत विश्वसनीय आणि नेत्र रुग्णांच्या सेवेला पात्र ठरलेल्या सचिन हरमलकर व स्नेहल हरमलकर यांच्या एस. एस. ऑप्टिक्स या नव्या दालनाचा उद्या दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्तावर शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी श्री. हरमलकर कुटुंबीयांकडून तमाम ग्राहक तसेच हितचिंतकांना आग्रहाचे आमंत्रण असल्याचे त्यांनी कळविले आहे.
स. एस. ऑप्टिक्स या नव्या दालनाचा शुभारंभ उद्या दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तक्ष बिल्डिंग, शॉप नंबर १, वैश्य भवन हॉलच्या समोर, गवळी तीठा सावंतवाडी येथे करण्यात येणार असल्याचे श्री. सचिन हरमलकर व स्नेहल सचिन हरमलकर यांनी कळविले आहे. या वेळी उद्घाटन समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अभियान व्यवस्थापक, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे श्री. वैभव पवार तसेच जिल्हा व्यवस्थापक सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे श्री. निलेश वालावलकर उपस्थित असल्याचे त्यांनी कळविले आहे.
तरी अधिक संपर्कासाठी 8188883797 / 7821982431 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही निमंत्रक श्री. सचिन राजाराम हरमलकर व सौ. स्नेहल सचिन हरमलकर यांनी कळविले आहे.