Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

राज्यातील ५ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या.!

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ उलटून गेला तरी प्रशासनातील खांदेपालट काही थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

त्यामध्ये पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे. तर मनोज रानडे यांची बदली पालघर सीईओ म्हणून करण्यात आली आहे. २०२० बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आले असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

१. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: २०१३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

२. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: २०२४) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

३. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: २०१९) – महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

४. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: २०२०) – संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

५. झेनिथ चंद्र देवंथुला (आयएएस: आरआर: २०२२) – सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles