‘जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमात बंदिवान मंत्रमुग्ध! ; महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन.

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारागृहामधील बंदीवानांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासह बंदीवानांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या प्रबोधनात्मक व मनोरंजानात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गायक विशाल कांबळे गायक कपिल कांबळे, गायिका कार्तिका कांबळे यांनी विविध देशभक्तीपर गीते, शिवाजी महाराज व महापुरुषांच्या जिवनावरील गीते, लोकगीत, भक्तीगीत तसेच हिंदी व मराठी
अशी एकापेक्षा एक अशी सरस गीते गाऊन बंदीवानांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातील गाण्यांच्या तालावर पुरुष व महिला बंदीवानांनीही ठेका धरला. या कार्यक्रमाला संगीतसाथ ओंकार कासकर (हार्मोनियम), तबलावादक भगवान काळसेकर (तबला), वराडकर, दीपराज रणशूर, आराध्या कांबळे यांनी तर ध्वनि संयोजन सांची गवस यांनी केले.
या कार्यक्रमांमुळे बंदीवानांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यास मदत झाली.

यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, सुभेदार महादेव गवस, संदीप शेट्ये लिपीक श्रेयस मयेकर, विवेक जाधव आदी उपस्थित होते. हा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग आणि पुणे येथील अप्पर पोलिस महासंचालक व महानिरिक्षणालय कारागृह व सुधारसेवा यांच्या सहकार्याने घेण्यात आला. यासाठी महानिरिक्षणालय कारागृह व सुधारसेवा अप्पर पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके, राज्याचे कारागृह व सुधारसेवा विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मुबंई दक्षिण विभाग भायखळाचे कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles