सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. यावेळी पैसे लावून अंदर बाहेर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून 9200 रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी राजन गणपत देसाई (माठेवाडा, सावंतवाडी), सुरेश रघुनाथ नार्वेकर (सर्वोदय नगर, सावंतवाडी), मनोज प्रभाकर नाईक (कोलगाव चव्हाटावाडी) व संतोष सहदेव राणे (लाडाची बाग) या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पालकर आदींनी ही धडक कारवाई केली आहे.