बदलापूर : त्या दुर्दैवी घटनेनंतर मी बदलापूरला जाऊन आलो आहे. विद्यालयाचे ट्रस्टी, मुख्यध्यापक, तसेच ज्या संस्थेने वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या सर्वांना भेटून आलो आहे. मी आंदोलकांना देखील भेटणार होतो, त्यामुळे तिथं झालेला लाठीचार्ज झाला नसता. सदर घटना 12 तारखेला घडली होती. मात्र शाळेने ही घटना दाबली होती. तिथं असणाऱ्या पीआय यांनी देखील कारवाईमध्ये दिरंगाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरण दाबून ठेवलं –
आज मी सर्व अहवाल मागवला आहे. जी कारवाई करायची आहे ती तात्काळ केली जाईल. आज रात्री अहवाल आल्यानंतर सबंधित संस्थेत प्रशासक नेमण्याबाबत निर्णय होईल. तसे अधिकार आम्हाला आहेत. संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरण दाबून ठेवलं आहे. ज्या डॉक्टरांनी सबंधित मुलीवर उपचार करायला नकार दिला त्यांच्यावर देखील कारवाई होईल. या मुलीवर उपचार झाले नाहीत. कोणतेही उपचार न होता ही मुलगी पोलीस ठाण्यात बाकडावर पडून राहते ही राज्यासाठी शरमेची बाब आहे, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.