अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याने आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला आहे. साईने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 82 धावांची खेळी केली. साईने यासह महारेकॉर्ड केला आहे. साई आयपीएल स्पर्धेत एकाच मैदानात सलग 5 अर्धशतकं करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. साईने याबाबतीत एबी डी व्हीलियर्सयाच्या विक्रमाची बरोबरी केली.
तसेच साईआधी एबी डीव्हीलयर्स याने 2018-2019 या दरम्यान एकाच मैदानात सलग 5 अर्धशतकं लगावली होती. एबीने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर आता साईने या महारेकॉर्डची बरोबरी केली आहे.
दरम्यान साईला या सामन्यात शतक करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र साई शतकापासून 18 धावांनी दूर राहिला. साईने 53 चेंडूत 154.172 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या. साईच्या या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता.
ADVT –