कारिवडे-पेडवेवाडीत हनुमान जन्‍मोत्‍सव सोहळा.!

सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी येथील हनुमान मंदिरात जय हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्‍मोत्‍सव सोहळ्याचे आयोजन १२ एप्रिल २०२५ रोजी करण्‍यात आले आहे. त्‍यानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सकाळी ८ वाजल्‍यापासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. स. ८.३० वा. हनुमान मूर्ती पूजा, अभिषेक, १० वा. सत्‍यनारायण महापूजा, दु. १२ वा. सत्‍यनारायण व हनुमान महाआरती, दु. १ वा. महाप्रसाद तसेच तीर्थप्रसाद. रात्रौ ७ ते १० पर्यंत पेडवेवाडीतील ग्रामस्‍थांची सुश्राव्‍य भजने होणार आहेत. तसेच रात्रौ १० वा. मातोंड – पेंडूर येथील जय संतोषी दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्‍यावा, असे आवाहन जय हनुमान मित्रमंडळ, पेडवेवाडी यांच्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles