अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. राम मंदिर उडवण्याची धमकी प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील 10-15 जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेलवर धमक्या आल्या आहेत. यासह अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टलाही धमकीचा मेल आला आहे. राम मंदिर ट्रस्टला मिळालेल्या ईमेलमध्ये सुरक्षा वाढवून ठेवा, असे म्हटलं असून सुरक्षेत वाढ न केल्यास राम मंदिर बॉम्बने उडवले जाईल, अशी धमकीच या मेल मधून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामजन्मभूमी ट्रस्टलार गेल्या सोमवारी रात्री धमकीचा मेल आला होता. याप्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं असून सायबर सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
ADVT –


