बांदा : आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक शेती हे वरदान असून सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे प्रमुख उद्दिष्ट आहे या अनुषंगाने कोनशी येथे नैसर्गिक शेतीची जाणीव आणि जनजागृती होण्यासाठी कार्यक्रमाचा शुभारंभ कोनशी सरपंच साधना शेटये, मंडळ कृषी अधिकारी बांदा वाय. जे. भुईंबर, तालुका तंत्र अधिकारी प्रकाश पाटील, कृषी पर्यवेक्षक मनाली परब, आत्मा बी.टी. एम् मीनल परब, कृषी सहाय्यक पूनम देसाई, ग्रामसेवक श्री. ठाकुर आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.

शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा होणारा बेसुमार वापर कमी करणे आणि नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.यातुनच आरोग्याच्या दृष्टिने नैसर्गिक शेती लाभदायक आहे. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो त्यातून जमिनीची सुपीकता नष्ट होते तसेच आरोग्याच्या दृष्टीने भयंकर घातक अशा आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे.यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आव्हान मंडळ कृषी अधिकारी वाय. जे. भुईंबर यांनी केले.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सखोल मार्गदर्शन तालुका तंत्र अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले.
नैसर्गिक शेती शाश्वत शेती असून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जागृती याविषयी मार्गदर्शन आत्मा बीटीएम मीनल परब यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन मनाली परब तर आभार पुनम देसाई यांनी मानले.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


