Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मुंबईतल्या ‘खास भागात’ दीपिका-रणवीरचं नवं घर ; घराची किंमत तब्बल १०० कोटी रुपये.

मुंबई :  बॅालीवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग लवकरच त्यांच्या नव्या घरात रहायला जाणार आहेत. नुकताच सोशल मीडियावर त्यांच्या नव्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घराची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. व्हिडिओत दिसणार नव आलिशान घर हे मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडमध्ये आहे. या घरात हे दोघेही लवकरच शिफ्ट होणार आहेत. या घराची किंमत तब्बल १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि सलमान खान शेजारीच हे दोघेही राहायला जाणार आहेत. दीपिका-रणवीरचे हे ‘ड्रीम हाऊस’ समुद्राच्या अगदी जवळ आहे. बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील दोघांचं घर १६ मजल्यापासून ते १९ मजलापर्यंत आहे.

कमालीची जोडी –
रणवीर आणि दीपका हे एकमेकांना अनेक वर्ष डेट करत होते. यानंतर दोघांनी लग्न करायचे ठरवले. गेल्याच वर्षी दोघं आई बाबा झाले. दीपिकाने ८ सप्टेंबर २०२४ रोजी एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव दुआ असं ठेवलं आहे. अजूनपर्यंत या दोघांनीही दुआला समोर आणलं नसलं तरी बऱ्याचदा रणवीर दीपिका त्यांच्या लेकीसोबत विमानतळावर स्पॅाट झाले आहेत.
…………………………………….

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles