प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं.! ; ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास.

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवलं. प्राथमिक माहितीनुसार दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.या घटनेमुळं सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोसर्जन होते. केवळ सोलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट आणि जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे.  त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले?, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.. रुग्णालयात जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू बाहेर प्रचंड गर्दी केली

डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकतात.

शिरीष वळसंगकर यांची वैद्यकीय कारकीर्द –
1. अनिवार्य रोटरी इंटर्नशिप इंटर्न, सीपीआर हॉस्पिटल- कोल्हापूर (01/07/1978 ते 31/12/1978)
2. इंटर्न, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी (01/01/1979 ते 30/06/1979)
3. जनरल हॉस्पिटल, सोलापूर येथे तीन वर्षांचे पदव्युत्तर प्रशिक्षण (डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज-सोलापूर) अंतिम एमडी
4. निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार (न्यूरोलॉजी विभाग) बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त (07/05/1983 ते 22/12/1983).
5. लोकम कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट – बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (08/05/1983 ते 23/05/1983 आणि 10/11/1983 ते 20/11/1983).

6.एसपी इन्स्टिटयूट ऑफ न्युरोसायन्सेस, सोलापूरचे ते प्रमुख होते

दरम्यान डॉ.शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली हे दोघेही न्युरोलॉजिस्ट आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles