ओटवणे : जय भीम युवक कला क्रीडा मंडळ ओटवणे तसेच समस्त महिला बचत गट व महिलावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव उत्साहात पार पडणार आहे,
तरी या निमित्त सकाळी ९.३०वाजता प्रतिमापूजन त्रिसरण पंचशील.
१०.०० मुलांची भाषणे.
दिवसभर विविध स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा
रात्रौ ठीक 7 वाजता जाहीर सभा, ठीक 8.वा. गायक अमित तांबुळकर यांचा “भीम गीत “गायनाचा कार्यक्रम तसेच वाजता रात्रौ ठीक 10 वा. कलांकुर ग्रुप तेंडोली, आंबेडकर नगर प्रस्तुत “दादरा” ही एकांकिका सादर होणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती जयभिम युवक कला क्रीडा ओटवणे ,व वाडीतील सर्व महिला समूह.यांकडून करण्यात आले आहे.