सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.
सकाळी 11 वाजता “कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे” या कामाच्या भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : देवबाग, ता. मालवण) दुपारी 3.30 वाजता श्री. प्रभाकर सावंत यांची भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ : प्रहार भवन, कणकवली) दुपारी 4.30 वाजता “ऑपरेशन सिंदूर” या भारतीय सैन्यदलाने केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीस उपस्थिती. (स्थळ : पटकी देवी मंदिर, कणकवली).