वेंगुर्ला : वेंगुर्ला – वेतोरा ते कुडाळ अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संघटनेसह वेंगुर्ला वीज ग्राहक संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या दोनही संघटनांनी सतत 2 वर्ष हा विषय लाऊन धरला होता. वेंगुर्ला तहसीलदारमध्ये संजय गावडे यांनी वीज ग्राहकांची मीटिंग घेऊन प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. वनमोरे यांच्याकडे कुडाळ – वेंगुर्ला 11 KV तातडीने अंडर ग्राउंड टाकण्याचे काम चालू करावे, अशी जोरदार मागणी केली होती.
त्यावेळी श्री. वनमोरे यांनी 2 दिवसात काम चालू करू, असे आश्वासन तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासमोर दिले होते. वीज ग्राहक संघटनेची हीच सतत मागणी होती की, वेंगुर्ला वीज खंडित होण्याचा प्रकार रोखण्यासाठी कुडाळ – वेंगुर्ला अंडर ग्राउंड होणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे या मागणीला अखेर यश आले असून या लढाईमध्ये वीज ग्राहक संघटनेला यश आले असून वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर , जिल्हा व्यापारी संघटनेचे नितीन वाळके, तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, तालुका सचिव जयराम वायंगणकर, तालुका सदस्य वाल्मीक कुबल, माजी जिल्हाधक्ष श्रीराम शिरसाट, माजी जिल्हा सचिव नाईक यांनी श्री. वनमोरे आणि महावितरणचे आभार मानले आहेत. हा विजय वेंगुर्लावासियांचा असून, याही पुढे वीज ग्राहक संघटना वेंगुर्ला येथे 33 के.व्ही. वीज उपकेंद्र मंजुरीसाठी आपला लढा चालू ठेवणार आहे, असे संघटेनेने कळविले आहे.