सावंतवाडी : येथील सह्याद्री फाऊंडेशनतर्फे यंदा भरगच्च असा मान्सून महोत्सव राबविण्यात येणार आहे. यात तब्बल एक महिना कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तब्बल एक महिना हा महोत्सव चालणार आहे. यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सह्याद्री फाऊंडेशनची बैठक प्रमोद सावंत यांच्या सावंत फार्म हाऊसवर घेण्यात आली. यावेळी सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, अध्यक्ष रवींद्र मडगावकर. सचिव प्रताप परब, सदस्य ॲड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, अशोक सांगेलकर, प्रमोद सावंत,. सुनील खानोलकर, समीर पालव आदी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामात मान्सून महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. हा महोत्सव तब्बल महिनाभर 18 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत घेण्याबाबतचे ठरवण्यात आले. या महिन्याभर कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील आठ – दहा दिवसात निश्चित केली जाणार आहे. सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम या महोत्सवात घेतले जाणार आहेत.