सहिष्णू पंडित एलएलबीच्या अंतिम वर्षात अव्वल.! ; कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजमधून कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण.

मालवण : व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळचा विद्यार्थी व मालवण येथील रहिवाशी सहिष्णू पंडित यांनी एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच वर्षांच्या कायदे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत, पाच वर्षांच्या या कायदे अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातून प्रथम श्रेणी व प्रथम क्रमांक असे यश संपादन केल्याबद्दल सहिष्णू पंडित यांनी व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे चेअरमन व्हिक्टर डांटस आणि प्राचार्या सौ. शिल्पा मर्गज व महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी, महाविद्यालयीन वरीष्ठ व सहाध्यायी मंडळी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सहिष्णू पंडित हे मालवण टोपीवाला हायस्कूलचे माजी शिक्षक कै. श्रीनिवास पंडित व मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे नातू आणि रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मालवणातून विशेष अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles