वाशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असणारे युद्ध आता आणखी हिंसक आणि उग्र स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करा, असा इशारा नागरिकांना दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करण्याची गरज आहे. अणुकरारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे. इराणने या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. ही किती शरमेची बाब आहे आणि मानवी जीवांचा अपव्यय आहे. इराणकडे अणवस्त्रं असता कामा नयेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, ‘सगळ्यांनी तातडीने तेहरान खाली करा’, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



