धुळे : अक्कलपाडा प्रकल्प 100% भरण्यासाठी 198 हेक्टर जमीन अधिग्रहित करून प्रकल्प 2.75 टीएमसी एवढा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी शासनाने काल दिनांक 17/6/ 2025 रोजीच्या बैठकीत निर्णय घेतला. या निर्णयामुळे धुळे शहरासह धुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासहित शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
हिवाळी अधिवेशनात 21 डिसेंबर 2024 रोजी लक्षवेधी प्रश्न मांडताना आमदार राघवेंद्र पाटील (भदाणे) यांनी अक्कलपाडा 100% भरावा यासाठी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत काल रोजीच्या बैठकीत अक्कलपाडा 100% भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बैठकीस माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष बाबा, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण विधानसभाचे आमदार राघवेंद्र पाटील आदि उपस्थित होते.