चौकुळ येथील चुरणीची मूस, म्हाराटी बेरडकी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. ; सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा उपक्रम.

आंबोली : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने चौकुळ गावात दुर्गमस्थानी असलेल्या चुरणीची मूस आणि म्हाराटी बेरडकी या दोन प्राथमिक शाळेतील गरीब आणि गरजू अशा २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी सावंतवाडी तालुका परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते.
यावेळी चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर उर्फ बाबू गावडे, म्हाराटी बेरडकी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ हसबे व उपशिक्षक विद्याधर पाटील, चुरणीची मूस प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय वेतुर्लेकर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना अंकलीपी, दुरेघी चौरेघी, चौकट वह्या, स्कूल बॅग, कंपास बॉक्स, कलरसहित बुक आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.


सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने चौकुळ गावात दुर्गमस्थानी असलेल्या म्हाराटी बेरडकी आणि चुरणीची मूस या दोन्ही शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची गरज ओळखून शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर उर्फ बाबू गावडे, म्हाराटी बेरडकी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ हसबे व उपशिक्षक विद्याधर पाटील, चुरणीची मूस प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय वेतुर्लेकर यांनी
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles