युवकांच्या सतर्कतेने गो मातेला मिळाले जीवनदान ! ; युवासेना शहर प्रमुख निखिल सावंतसह युवा बांधवांचा पुढाकार.

सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथे गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एक गाय अत्यवस्थ अवस्थेत दिसून आली. संबंधित मालकानं याच ठिकाणी या गोमातेला बांधून ठेवले होते‌. ही गोष्ट शहरातील गोप्रेमी युवकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. शरद गोविंद अस्वले यांना याबाबत कल्पना दिली. यावेळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत गायीवर उपचार केले. वेळीच उपचार केल्यान त्या गोमातेला जीवदान प्राप्त झाले आहे.

गोमातेचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या युवासेना शहर प्रमुख निखिल सावंत, हितेश सातोस्कर, ओंकार सावंत, गोरक्षक कृष्णा धुळपनावर, लादू रायका, संजय गाड, मंदार पावसकर, अथर्व सावंत यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles