पुरलेल्या विधवेला बाहेर काढलं, मृत महिलेसोबत अजब घडलं? ; ‘या’ शहरातील धक्कादायक प्रकार.

गोंदिया : शहरात एका 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी गोंदियाच्या रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. भारती शहारे (40) रा. दासगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक महिला भारती शहारे यांच्या पतीचा एक वर्षापूर्वी आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या मुलांसोबत त्या दासगाव येथे राहत होत्या. दरम्यान 27 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

त्यानंतर आपल्या मुलांसोबत त्या दासगाव येथे राहत होत्या. दरम्यान 27 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मृत्यूनंतर 27 जून रोजीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, 29 जून रोजी पोलिसांनी संशयाच्या आधारावर खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. आता मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. घटनेचा तपास रावणवाडी पोलीस करत आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles