सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील लोककल्याण शिक्षण संस्था मुंबई संचालि, विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव या प्रशालेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक ०३ जुलै रोजी दुपारी ०२:३० वाचता संपन्न होणार आहे. यावेळी दहावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी तसेच इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी, माजी विद्यार्थी, पालक व आजगाव पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा समिती अध्यक्ष, शिक्षक पालक संघ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले आहे..



