ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे पितृछत्र हरपले. ; भास्कर पारकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

कणकवली : शहरातील जुन्या पिढी मधील व्यापारी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचे वडील भास्कर उर्फ भाई दिगंबर पारकर (वय ८४) यांचे आज बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सुमारे दीड महिन्यापूर्वीच संदेश पारकर यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज बुधवारी दुपारी 1 वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles