श्री एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे उद्या गुरूपौर्णिमिमेमित्त होणार उत्सव!

सावंतवाडी :  येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी खालील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७.०० वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघु रुद्र, ९.०० वा. श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती, १.०० वा.पासून तीर्थप्रसाद, सायं. ७.०० वा.नामस्मरण व आरती, रात्री ८.०० वा. स्थानिक भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तगणांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहून स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles