कलंबिस्त हायस्कूलमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप. ; माजी विद्यार्थी व विजय कदम मित्रमंडळ यांचा स्तुत्य उपक्रम.

सावंतवाडी : कलंबिस्त हायस्कूलचे माजी विद्यार्थी व विजय कदम मित्रमंडळ यांचे वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थी विजय कदम, राजेश पास्ते व शितल सावंत यांनी आर्थिक सहयोग देत याकामी पुढाकार घेतला. विजय कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनीही गरजू विद्यार्थ्यांना कंपासपेट्यांचे वाटप केले. यावेळी विजय कदम, राजेश पास्ते, संजीव पालकर,अंकुश सांगेलकर मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles