कणकवली विद्यामंदिर येथील माध्यमिक प्रशालेत नागपंचमीनिमित्त पर्यावरणपूरक नागमूर्तींचे भव्य प्रदर्शन!

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नागपंचमी सणाचे औचित्य साधून पर्यावरण विभाग प्रमुख श्री प्रसाद राणे सर व हरितसेना विभाग प्रमुख सौ विद्या शिरसाट मॅडम श्री नागभिडकर सर यांनी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भारतीय सणांची परंपरा आणि सांस्कृतिक महत्च सांगून पर्यावरणपुरक शाडू मातीपासून नाग मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण श्री राणे सरांनी देऊन शाडू मातीपासून नाग मूर्ती तयार करून घेण्यात आल्या. त्या मूर्तींचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्गाटन प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सरांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी पर्यावरणांचे महत्व आणि भारतीय सणांची परंपरा यांविषयी माहिती सांगून नागपंचमी सणाचे निसर्ग विषयक महत्व व निसर्गातील प्राणी पशू पक्षी यांचे रक्षण करावे, असा संदेश दिला. पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सरांनी नागपंचमी सणांची माहिती सांगून पर्यावरणपूरक मूर्ती कलाकारांचे कौतुक केले.
नागमूर्ती प्रदर्शन पहाण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नंतर अल्प किंमतीत नागमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या प्रदर्शनात प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सक्रीय होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. वळंजू , विश्वस्त. श्री डेगवेकर व संस्था पदाधिकारी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles