बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आयोध्या राहुल व्हरकटे असे मयत महिलेचे नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या. चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. आणि आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला. ही हत्या की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र एका होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
‘त्या’ बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला नाल्यात.
0
40



