ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले, दोघे गंभीर जखमी! ; कुडाळ येथील दुर्दैवी अपघात!

कुडाळ : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना, ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या समोर ट्रॅक्टर आला असता अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.

अनियंत्रित झालेल्या या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले गेले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles