नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार खेळल्या जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 16 सदस्यीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळत होते. त्यापैकीच एक सरफराज खान.
भारताच्या 16 सदस्यीय संघात सरफराज खान हा एकमेव खेळाडू आहे, ज्याची बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड झाल्यानंतरही बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत त्याला संघात जागा दिली आहे. सरफराज खान दुसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केएल राहुलला संधी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ 12 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्री-सीरीज प्रारंभिक शिबिर सुरू करेल, परंतु सरफराज या शिबिराचा भाग असणार नाही. त्याऐवजी तो 12 सप्टेंबरपासून अनंतपूर येथे सुरू होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारत ब विरुद्ध इंडिया क कडून खेळेल.
सरफराज खान बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी खेळणार नाही?
बंगळुरू येथे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत भारत अ विरुद्ध भारत ब संघाच्या 76 धावांनी विजय मिळवण्यात सरफराज खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या डावात सात चौकार आणि एका षटकारासह आक्रमक 46 धावा केल्या. आता त्याला कसोटी मालिकेपूर्वी आपला फॉर्म आणखी मजबूत करायला आवडेल. मात्र, चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत सरफराजला खेळणे कठीण मानले जात आहे. कारण केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.