अभिमानास्पद! – डॉ. दिनेश नागवेकर यांचा ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने कोल्हापुरात सन्मान!

कोल्हापूर : सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, वास्तुशास्त्रीय सनदी अभियंता आणि बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांचा कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनने कोल्हापूर इंजिनिअरींग असोशियनच्या सभागृहात संस्थापक अध्यक्ष गणेश विटकर सचिव तेजस्विनी दिवटे, अभिनेत्री मधु मेगाने यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन डॉ. दिनेश नागवेकर यांना महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन ही १९४७ मध्ये स्थापन झालेली कोल्हापूरातील सर्वांत जुनी संस्था आहे.

यावेळी कोल्हापूरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम केलेल्या कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले. डॉ. दिनेश नागवेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles