सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा!

सिंधुदुर्गनगरी :  शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने जाहीर पाठिंबा दर्शविला.
याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे साहेब यांना संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय शिंदे व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी श्री. अशोक गिते यांनी प्रत्यक्ष भेटून सादर केले.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच इतर गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
‘Save Education, Save Nation’ या भूमिकेचा पुनरुच्चार करत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर केला असून, शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे साहेब यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles