उद्धव ठाकरे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला! ; नेमकं कारण काय?

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील ही दोन्ही ठाकरे बंधूंची 9 वी भेट आहे. उद्धव ठाकरे हे चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर दाखल झाले आहेत.

दरम्यान सध्या दिवाळी सण सुरू आहे, दिवाळीमुळे शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात प्रचंड ट्राफिक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वाहतूक कोंडीतून वाट काढत मागच्या दरवाजानं शिवतीर्थवर पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचले आहेत. ही एक कौटुंबीक भेट आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles