Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

BIG BREAKING – ‘या’ कंपनीच्या भीषण स्फोटात २ कामगारांचा जागीच तर एकाचा उपचादरम्यान मृत्यू ; जबरी स्फोटाने धाटाव परिसर हादरला, स्फोटाची मालिका सुरूच, कामगारांची सुरक्षा रामभरोसे.!

शशिकांत मोरे

रोहा : रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम कंपनीत काल गुरुवारी सकाळी ११:२० च्या दरम्यान भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. ODB 2 उत्पादन धुण्यासाठी असलेल्या मेथानोल स्टोरेज टँकवर वेल्डिंगचे काम सुरू होते,त्याच स्पार्किंगने मेथानोल टँकचा स्फोटक भडका उडाला, थरकाप उडवणाऱ्या स्फोटात २ कामगारांचा तडफडून जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटात ४ कामगार जखमी झाले, त्यातील ३ गंभीर जखमी कामगारांना अधिक उपचारार्थ मुंबई हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती कंपनी प्रशासक विद्याधर बेडेकर यांनी दिली.त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.मात्र तोही ऐरोली येथील बरणिंग इस्पितळात उपचारा दरम्यान मृत झाला आहे.स्फोटाची तिव्रता प्रचंड होती.स्फोटाच्या आवाजाने धाटाव,बारसोली यांसह लगतच्या वस्तीतील घरांच्या खिडक्या हलल्या,त्यातून स्फोटाची भयावता समोर आली.


भयानक स्फोटात कामगार मृत्युमुखी पडल्याने कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा अक्षरश: रामभरोसे झाली आहे.अनेक कंपन्यांत स्फोटाची मालिका सुरूच असल्याने कामगारांत कायम भितीचे वातावरण राहिले आहे.आगीच्या घटना व जीवघेणे स्फोट रोखण्यात कंपन्या मुख्यतः आरआयए प्रशासन नेहमीच अपयशी ठरले यावर आजही शिक्कामोर्तब झाले.दरम्यान, इतिहासात साधना कंपनीने स्फोट मालिकांत हॅट्रिक केली होती.अनेक स्फोटक अपघाती घटना साधना कंपनीच्या नावावर आहेत, साधना कंपनीची स्फोटाची मालिका खंडीत होणार तोच गुरुवारच्या भयानक स्फोटाने साधना कंपनी पुन्हा डेंजर झोनमध्ये आली असल्याचे बोलले जात आहे तर साधनाच्या भीषण स्फोटाने एमआयडीसीतील कंपन्या पूर्णतः सुरक्षीत नाहीत?हेच ठळक झाले आहे.
धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत स्फोटक घटना वाढल्यात.मागील दोनतीन वर्षात अपघात व स्फोटक घटनांनी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला. ट्रान्सवर्ड, रोहा डायकेममधील अपघाताची घटना ताजी आहे. त्याआधी एक्सेल, युनिकेम,निलिकॉन,सॉल्वे, दीपक नायट्रेटमधील स्फोटक घटनांत कामगारांना जीव गमवावा लागला. अँथेआ कंपनीतील आगीच्या अपघात घटनाने एमआयडीसीचीच सुरक्षा धोक्यात आली की काय ? असेच भयान वास्तव होते.त्यातून सुरक्षा उपायांवर प्रचंड चर्चा, खलबते झाली. मात्र अँथेआसारख्या अपघाती घटनांतून कोणत्याच कंपनी व्यवस्थापनाने बोध घेतलेला नाही. याच घडामोडीत गुरुवारी साधना कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली. वेल्डिंगची ठिणगी पडल्याने मिथ्यनोल टाकीचा स्फोट झाला,त्या स्फोटात संजीव कुमार, दिनेश कुमार राज्य उत्तरप्रदेश या २ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला,तर बोसकी यादव यांसह दोन गंभीर कामगारांना अधिक उपचारार्थ मुंबई हलविण्यात आले, एका जखमी कामगारावर रोहा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत झाला.


स्फोट घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली, परिस्थिती हाताळली. स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटाने शेजारील गावातील घरांच्या खिडक्या हालल्या, आजूबाजूच्या कंपन्या वस्तीतील घरांना चांगलाच हादरा बसल्याचे प्रथमदर्शनीने सांगितले. स्फोटाची घटना समजताच नागरिकांनी कंपनीसमोर एकच गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला.दरम्यान,आधीच डबघाईला आलेल्या, त्यातून सावरण्याची उम्मिद राखलेल्या साधना नायट्रोकेम कंपनीला गुरूवारच्या स्फोटाने चांगला दणका दिला,आता पुढे कंपनी कितपत सावरते ? हे पाहावे लागणार आहे तर वाढत्या अपघातातून कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles