Tuesday, December 9, 2025

Buy now

spot_img

शरद पवार अन् अदानी सोफ्यावर, मुख्यमंत्री मात्र खुर्चीवर! ; शाही सोहळ्यात दिग्गज एकत्र, व्हायरल फोटो कुणाच्या लग्नातला?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांची निवड झाली, तेव्हा नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कारण, या दोन्ही नेत्यांनी एमसीए निवडणुकीत त्यांना मदत केली होती. विशेष म्हणजे याच निवडणुकीसंदर्भाने भाष्य करताना शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुकही केले होते. आता, सातारा येथील एका लग्नसोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यासमवेत उद्योगपती गौतम अदानी हेही या लग्नसोहळ्याला हजर होते. सोशल मीडियावर या तीन दिग्गजांचे फोटो व्हायरल होत आहेत. तर, स्वत: शरद पवारांनीही सोशल मीडियातून माहिती दिली.

आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलोनवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली आहे. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी बसलेले आहेत. तर, बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही बसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटीझन्स कमेंट करुन मजा घेत आहेत. तुमच्या पोस्टमध्ये गौतम अदानींचा का उल्लेख केला नाही? असा सवाल कमेंट करुन विचारला जात आहे.

दिग्गजांना जोडणारं शरद पवाराचं राजकारण –

दरम्यान, शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, राजकीय विरोधक म्हणून ते सत्ताधारी व भाजपवर सातत्याने टीकाही करतात. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीक केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानातील निवडणुकीतवरुन त्यांचं कौतुकही केलं होतं. तर, गौतम अदानी यांच्याशीही शरद पवारांची जवळीक आहे. त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातही गौतम अदानींचा उल्लेख असून अदानींनी बारामतीलाही भेट दिली होती. त्यामुळे, शरद पवारांचं राजकारण नेहमीच दिग्गजांना जोडण्याचं पाहायला मिळालं आहे. लग्नातील या फोटोमुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राजकारणावर चर्चा होत आहे.   

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles