लोकसेवेसाठी आम्ही राजकारणात आलोय, आपल्या विकासासाठी आम्ही कटिबद्द! : युवराज लखमराजे भोंसले यांची प्रांजळ भावना.

सावंतवाडी : पाच वर्ष सक्षमपणे आम्ही विकास करू, लोकसेवेसाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. ही सुंदरवाडी खेमसावंत यांनी वसवली‌. ३५० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. मोती तलाव, राजवाडा लोकांचा आहे असं मत युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले.

आरोग्य, ड्रेनेज सिस्टीमसह इतर सुविधा राजघराण्याच्या काळात झाल्या. मात्र, नंतर त्यावर तेवढं लक्ष दिलं गेलं नाही आज आमच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ती संधी आम्हाला मिळत आहे‌. आरोग्य सेवा व ड्रेनेजची समस्या आम्ही १०० टक्के सोडवणार आहोत. त्या काळात राजघराण्यान हे काम केले.‌ युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सामान्य घराण्यातील आहेत. मात्र, त्यांचा विवाह राजघराण्याशी झाला. त्यांनाही सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. राजमाता, राणी हा मान जनतेनं आम्हाला दिला. जमीन, पैसा येतील जातील पण लोक कायम सोबत राहतात यासारख भाग्य आहे. शिवरामराजे भोसले यांचा वारसा आम्ही चालवत आहोत. मधल्या पिढीने सामाजिक, शैक्षणिक कार्य केलं. अनेक जमीनी दिल्या आहेत. आजही जमीनी द्यायला तयार आहोत. लोकांसाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे. राजघराण सदैव लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सामान्य घराण्यासारखेच आहोत. तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असणार असून तुमच्या दारात देखील सेवेसाठी थांबणार आहोत. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन लखमराजे भोंसले यांनी केलं.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा नेते विशाल परब, वेदिका परब, अतुल काळसेकर, बबन साळगावकर, सुधीर आडिवरेकर, संदीप गावडे, संध्या तेरसे, मनोज नाईक, ॲड. अनिल निरवडेकर, मायकल डिसोझा आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपचे उमेदवार उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles