सावंतवाडी : शहरातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक यांना १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क करून “मुंबई क्राईम ब्रँच म्हणून बोलतो असे भासवून आपला अकाउंट वरून 25 लाख रुपयांचा व्यवहार झाला असून मनी लॉन्ड्रीगमध्ये आपली चौकशीसाठी स्वतः मुंबईला यावे लागेल प्रत्यक्ष येणे शक्य नसेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे ऑनलाईन चौकशीला सामोरे जा!”, असे सांगून फसवून अज्ञात आरोपी याने फिर्यादी ज्येष्ठ नागरिक यांचे फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड तसेच शेअर मध्ये गुंतवलेले रक्कम रुपये 97,000,00/-( 97 लाख रुपये मात्र) आरटीजीएस द्वारे फिर्यादी यांचे कडून आपले अकाउंट वर ऑनलाईन ट्रान्सफर करून घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सायबर पोलिसांच्या मदतीने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.
सदर गुन्हाच्या प्राथमिक तपासात सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग यांच्या मदतीने साधारण ३/४ तासात सुमारे ९ लाख रुपये होल्ड करण्यात यश आले आहे. पुढील समांतर तपास सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग हे करीत आहेत.
नागरिकांना विशेषता ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्याने अशा प्रकारचे कोणतेही कॉल किंवा मेसेज आल्यास घाबरून जाऊन चुकीचा प्रतिसाद देऊ नये आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती द्यावी, १९३० या क्रमांकावर तात्काळ माहिती रजिस्टर करावी व जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा.



