सावंतवाडीतील राड्यानंतर पोलीस स्टेशनातही दोन गटात बाचबाची! ; शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपा युवा नेते विशाल परब सावंतवाडी पोलीस स्टेशनात दाखल!

सावंतवाडी : आज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दरम्यान शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी दोन्ही गट एकमेकांना चांगलेच भिडले होते. पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 7 मध्ये बाचाबाची झाली त्यानंतर सायंकाळी ही जोरदार राडा झाला. सदर घटना सावंतवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर घडली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही गटाचे कार्यकर्ते परस्पर विरोधी जोरदार भिडले व पोलीस स्टेशनमध्येही जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान जिल्हाप्रमुख संजू परब व शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत. दरम्यान दोन्ही गट एकमेकांबद्दल तक्रार देतात की सामंजस्याने हा प्रश्न मिटतो? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. मात्र कधी न पहावयास मिळालेला राडा आज सावंतवाडीत पहावयास मिळाला, ह्या घटनेमुळे सामाजिक स्तरातून खेद व्यक्त होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles